नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी.आर.हायस्कूलचे विज्ञान शिक्षक भरत पेंढारकर व महिला बालविकास विभागतील पर्यवेक्षिका सुनिता सोनवणे (पेंढारकर) यांचा चिरंजीव चावरा स्कूलचा व एनपी फाउंडेशन नंदुरबारचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी निल भरत पेंढारकर याने सन २०२३-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
.
या परीक्षेचे स्वरूप चार लेवल मध्ये असते लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व कृती संशोधन अहवाल व त्यावरील तोंडी परीक्षा या सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार करून निलचा बालवैज्ञानिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बक्षिसाचे स्वरूप गोल्ड मेडल, सर्टफिकेट व ३००० हजार रुपये स्कॉलरशिप देऊन चर्च गेट मुंबई येथे या वर्षाचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तिसर्या व चौथ्या लेवलसाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातून ३३१ विद्यार्थ्यांमधून १०% टक्के कोट्यात म्हणजेच ३१ विद्यार्थ्यांमध्ये निलची अंतिम निवड करण्यात आली. बाल वैज्ञानिक पुरस्कार मिळवलेला नंदुरबार जिल्ह्यासाठी निल पेंढारकर हा आजपर्यंत एकमेव विद्यार्थी ठरला आहे. निलने केलेल्या अथक प्रयत्नातून हे यश त्याला मिळाले आहे. त्याचावर सर्व स्तराकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे. नीलच्या या यशामागे एनपी फाउंडेशनचे निलेश पाटील व बहीण श्रावणी पेंढारकर व त्याला परीक्षेच्या चारही टप्प्यावर मार्गदर्शन करणारे गुरुवर्य यांचा मोलाचा व सिंहाचा वाटा आहे.
असे ठरविले जाते बालवैज्ञानिक
बृहन्मुंबई अध्यापक मंडळातर्फे १९८१ पासून होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होते.
दुसर्या टप्प्यात पहिल्या परीक्षेतील ७.५ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यात त्यांची प्रयोग करण्याची क्षमता पाहिली जाते. यातील दहा टक्के विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी निवडले जातात. तिसर्या टप्प्यात त्यांच्यातील शास्त्रज्ञाची चिकित्सक वृत्ती तपासण्यासाठी एक प्रकल्प करावा लागतो. सर्व पडताळणी केल्यानंतर मिळालेल्या गुणांची गोळाबेरीज करून बालवैज्ञानिक ठरविले जाते. तिसर्या व चौथ्या टप्प्याची मुलाखत सोबत मुंबई येथे घेतली जाते.