नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील राजस्थानी मारवाडी समाजातील कुमारीका नवविवाहितेचा व सौभाग्यवती महिलांनी धार्मिक परंपरेने सोळा दिवस चालणारा गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
भारतीय संस्कृती संपूर्ण जगात सण उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. शिव पार्वतीचा धार्मिक उत्सव शिव म्हणजे गण आणि माता पार्वती म्हणजे गौर असे गणगोर हा सण उत्सव कुमारिका,
नवविवाहित आनंदात व उत्साहात श्रद्धेने सोळा दिवस साजरा करत असतात.गणगौर उत्सवाचे शहादा येथील महालक्ष्मी नगर येथील दीनदयाल सत्यनारायण शर्मा यांनी आयोजक केले.