नंदुरबार l प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३५ व्या बलीदान दिनानिमित्त मुक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रतिष्ठान हिंदूस्तानच्या वतीने मागील एक महिना धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात आला.
अनेक धारकरी बांधवांनी हा एक महिना आपली आवडती वस्तू गोड पदार्थ, चहा, चप्पल,मुंडन करून केस अर्पण केले. इत्यादी गोष्टीचा त्याग देखील केला होता.दररोज सायंकाळी नंदुरबार शहराच्या बाहेरपुरा परिसर, राम नगर,स्वराज्य नगर, गांधी नगर स्टॉप, नवनाथ नगर, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी बलिदान मास निमित्ताने आदरांजली वाहण्यात येत होती. सोमवार ८ एप्रिल रोजी फाल्गुन अमावस्या दिवशी नंदुरबार शहरात शंभुराजांच्या ३३५ व्या बलीदान दिनानिमित्त मुकपद यात्रेचे आयोजन करण्यात होते.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जुनी नगरपालिका येथून सायंकाळी ६ वाजता पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.शहरातील वेगवेगळ्या भागातून फिरून छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करत मुकपदयात्रेचा समारोप करण्यात आला. धर्मवीर संभाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. पदयात्रेला नंदुरबार शहरातील श्रीशिव शंभुपाईक,धारकरी उपस्थित होते.