Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा पोलीसांनी जप्त केली 33 लाखाची बनावट दारु

team by team
April 11, 2024
in क्राईम
0
अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई केली असून 18 लाखांचा मद्यसाठा जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी
अवैध दारु वाहतूक करणा-या वाहनास नाकाबंदी दरम्यान पकडून शहादा पोलीसांनी 33 लाख 60 हजार रुपये किमतीची बनावट दारु जप्त केली.

 

 

अधिक माहिती अशी की, 10 एप्रिल 2024 रोजी शहादा येथील शहादा- दोंडाईचा रोडवरील संविधान चौक येथे नाकाबंदी दरम्यान पोउपनि-छगन चव्हाण व स्टाफ अशांना दोंडाईचा कडून शहादयाचे दिशेने एक पांढ-या रंगाची टाटा कंपनीचे वाहन दिसले, सदर वाहन थांबवून त्यास चेक केले असता, वाहन चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अज्जू खान रशिद खान रा.खडकपाणी ता. कसरावद जि. खरगोन राज्य मध्यप्रदेश असे सांगुन क्लीनर नाव मोहम्मद मेहफूज मोहम्मद लियाकत शहा रा. पनाह नगर, बुराई, मिया कापूरवा ता. कुंडा प्रतापगड जि. प्रतापगड राज्य – उत्तरप्रदेश असे सांगितले.

 

 

 

त्यांना सदरचे वाहनातील मालाबाबत विचारपूस करता त्यांनी पोलीसांना चुकीची माहिती दिली. त्यावरुन संशय आल्याने संबंधित वाहनास चेक केले असता त्यामध्ये एकूण 33 लाख 60 हजार रुपये किमतीचा अवैध बनावट दारुचा माल त्यात एकूण 500 बॉक्स असे मिळून आले आहेत.

 

 

 

सदरचा माल हा चालक अज्जू रशिद खान व क्लीनर मोहम्मद महेफूज मोहम्मद लियाकत शहा यांनी अहमदनगर येथील व्यक्तींकडून गाडीसह ताब्यात घेतला असल्याचे सांगितले. व सदरचा माल एका अज्ञात व्यक्तीला (नाव गाव माहित नाही) देण्यात येणार होता बाबत कळवित आहेत. तरी सदरचा अवैध बनावट दारुचा साठा कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केला असुन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडुन एकुण 500 खोके असा एकुण 33 लाख 60 हजार रुपये किमतीची बनावट दारु अवैधरित्या बाळगून त्याची चोरटी वाहतूक करत असतांना त्यांच्या मूसक्या आवळल्या. तसेच सदर आरोपींकडून दारुची चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन देखील जप्त करण्यात आले आहेत.

 

 

 

 

व पुढील अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोउपनि छगन चव्हाण, पोशी-दिनकर चव्हाण, पोशि- अनमोल राठोड, पोशि- मुकेश राठोड, पोशि- विकास शिरसाठ, पोशि- राकेश मोरे असे शहादा पोलीस ठाण्याचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

घरोघरी विकासगंगा यावी यासाठी पुन्हा एकदा विजयाची गुढी दारोदार उभारूया : खा. डॉ. हिना गावित

Next Post

शासकीय कामात अडथळा करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला दोन वर्ष सश्रम कारावास

Next Post
शासकीय कामात अडथळा करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला दोन वर्ष सश्रम कारावास

शासकीय कामात अडथळा करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावला दोन वर्ष सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add