नंदुरबार l प्रतिनिधी
विकास घडवणाऱ्या हातांना बळकट करण्याचा आजच्या नववर्षारंभाच्या दिनी संकल्प करूया, असे आवाहन करीत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी समाजातील प्रत्येक घटक प्रगतशील बनावा, प्रत्येक गाव विकसनशील बनावे आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी यावी; अशा शब्दात समस्त नंदुरबार जिल्हा वासी यांना शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा प्रथम दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नागरिक मोठ्या उत्साहाने आपल्या घरासमोर गुढी उभारून साजरा करीत असतात. 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी दहा वाजेच्या शुभमुहूर्तावर विरल विहार येथील निवासस्थानी मांगल्याची गुढी उभारून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी विधिवत पूजा करून साजरा केला.
काल चैत्र प्रतिपदेच्या दिनी मराठी नववर्षाचा शुभारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी आपल्या निवासस्थानी परंपरेनुसार पूजन करून गुढी उभारली आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार यांना वरील प्रमाणे शुभेच्छा दिल्या.