नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोणखेडा ता.शहादा येथे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुखांच्या बैठकीत (कार्यशाळा) मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्याचे आदिवासी विकासमंत्री ना.डाॅ.विजयकुमार गावित, परिसराचे नेते पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, खा.डाॅ.हिना गावित,जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित,शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ प्रभारी तुषार रंधे, जिल्हा अध्यक्ष निलेश माळी,सरचिटणीस कैलास चौधरी, जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे,
ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया,शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सदस्य नुहभाई नुरानी,माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, कैलास चौधरी, नितीन पाटील, विनोद जैन, जितू जमदाडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी लोकसभा निवडणुकीचे नियोजनसह पक्षाच्या वतीने आगामी काळात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.