नंदुरबार l प्रतिनिधी
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी दि.९ एप्रिल २०२४ रोजी नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दि.२१ ते २४ एप्रिल २०२४ दरम्यान (राहुरी) अहमदनगर येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी सिनेर (खुला) गटात नंदुरबार जिल्ह्यातील मुले व मुली क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जिल्हा संघामार्फत सहभागी होणार आहे. यासाठी दि.९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत नंदुरबार येथील विरल विहार कॉलनी खोडाई माता रोड, परांडे हॉस्पिटल समोर, आनंदी कृपा स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रांगणात नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
या निवड चाचणीत सहभाग होण्यासाठी आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र व तीन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी खेळाडूंनी असोसिएशनचे नंदुरबार जिल्हा सचिव संदिप खलाणे (मो.9420917907) व शरीफ शेख (मो. 8329448130) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.