नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त युवा उद्योजक प्रथमेश शिरीष चौधरी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी शिवभक्त मयूर नरेंद्र तांबोळी यांची नुकतीच भारतीय सैन्यात निवड झाली आहे.
त्याबद्दल राणी लक्ष्मीबाई सांस्कृतिक मंडळाच्या वतीने युवा उद्योजक प्रथमेश चौधरी, मयूर चौधरी यांच्या हस्ते अग्निवीर मयूर तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मयूर चौधरी, गणेश चौधरी, ओम चौधरी, राहुल चौधरी,आकाश गावित, राम चौधरी, गौरव शिरसाठ, कृष्णा ठाकरे, पवन चौधरी,शुभम शिरसाठ, जयेश भोई, मनीष चौधरी, सुनील चौधरी,मोतीलाल चौधरी यांसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.