म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलवाडे येथे एका विवाहित तरुणावर चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.याबाबत म्हसावद पोलिसात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रानुसार सविस्तर वृत्त असे की,शहादा तालुक्यातील सुलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ होळी सणा निमित्ताने गेर नाचण्याचा कार्यक्रम काल दुपारी १ वाजेच्या दरम्यान सुरू होत.
त्यावेळी सोमनाथ गेंडल सोनवणे रा.बीलाडी बामखेडा हा तरुण होळी सणाचा रूढी परंपरागत गेर बनून हातात चाकू घेऊन नाचत होता नाचताना तो लोकांना व मयतास चाकू घेऊन नाचत असल्याचे दाखवत नाचता नाचता त्याचा धक्का मयत सुकलाल रघुनाथ पवार (वय २७) रा.बीलाडी बामखेडा याला लागल्याने वाद झाला.या वादातून सोमनाथ सोनवणे याने सुकलाल पवार यांच्या छातीवर चाकू ने वार करून गंभीर दुखापत केली.मयताच्या रक्तस्त्राव जास्त
होत असल्याने त्यास १०८ ने म्हसावद ग्रामीण रुग्णालयास दाखल करून गंभीर असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयास पाठविले मात्र नंदुरबारला घेवून जात असताना लहान शहादा जवळ त्याचा गाडीतच मृत्यू झाला.
त्यास जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले मात्र त्यास डॉक्टरांनी मृत घोषित फिर्यादी योगेश रघुनाथ पवार मयताचा भाऊ यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ गेंडल सोनवणे रा.बीलाडी बामखेडा यांच्या विरुद्ध ३०२ प्रमाणे म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास सपोनि राजन मोरे हे करीत आहेत.








