नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षपदी माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑल इंडिया काँग्रस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी के.सी.वेणुगोपाल यांनी यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रदेश कार्यकारिणी जाहिर केली. यात
माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, हरिष पवार, सुभाष कानडे, सुनील देशमुख यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर सरचिटणीस पदी अभिजीत सपकाळ, अरविंद तुकाराम शिंदे, अतुल कोटेचा, बलदेव खोसा, हेमंत ओगले, जितेंद्र देहाडे, मुजीब पठाण, नामदेव उसंदी, नामदेव किरसान, नामदेव आर. पवार, प्रमोद मोरे, राजन भोसले, संजय बालगुडे, संजय दुबे सत्संग मुंडे, तानाजी वणे यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षपदी माजी क्रिडा मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसला बळ मिळणार आहे.त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.