नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना मिलेट न्यूट्रीबार वाटप करण्यात आले.
पोषणयुक्त आहार पुरविणे, आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे आणि सामाजिक समानता विकसित करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे.
ह्या योजनेंतर्गत शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री मिलेट न्युट्रीबार वाटप करण्यात आले,भरड धान्यापासून तयार केलेले पौष्टिक बार ज्वारी, बाजरी, नाचणी पासून बनलेले असून लहान मुलांसाठी भरड धान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करणे लाभदायक ठरते या धान्यात भरपूर प्रमाणात खनिजे कॅल्शियम व प्रथिने असल्याने ही धान्य पोषक तत्त्वांचे आहार असून या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते भरड धान्यापासून तयार केलेले तीन फ्लेवरची न्यूट्रीबार, चॉकलेट, पीनटबटर बार शाळेमध्ये वाटप करण्यात आले