नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी हजारो समर्थकांसह काल सकाळी मुंबई इथे शिंदे गटात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय.
उध्दव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील शिवसेना कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला.आमदार आमश्या पाडवी हे अक्कलकुवा येथील हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. त्यांनी ठाकरे गटाचं जिल्ह्यात बऱ्यापैकी वर्चस्व तयार केलं होतं. मात्र, ते शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावेळी आमदार आमश्या पाडवींसोबत, जिल्हा परिषदेचे सभापती शंकर पाडवी, दहा महिला सरपंच, अठ्ठेचाळीस पुरुष सरपंच, जि प सदस्य व कुटुंबातील सदस्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.