शहादा l प्रतिनिधी
तालुका भारतीय जनता पक्षातर्फे बुधवार दि.6मार्च रोजी पक्षाच्या वतीने आयोजित “नारी शक्ती वंदन” या कार्यक्रमाच्या थेट आँनलाईन प्रक्षेपणात सहभाग घेतला.
नंदुरबार जिल्हा व शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सहभाग घेतला.
यावेळी गुर्जरी खाद्य संस्कृती ग्रंथाच्या लेखिका माधवीबेन मकरंद पाटील, लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या संचालिका कल्पना पटेल,भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, अनामिका चौधरी, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा ज्योती पाटील,उपाध्यक्षा मनिषा पाटील, सरचिटणीस पूजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.या उपक्रमांतर्गत नारी शक्तीचा पक्ष संघटन वाढीसाठी तसेच राष्ट्र विकासासाठी योगदानाबद्दल चर्चा करण्यात आली.शहादा परिसरातील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्याबाबत विचार करण्याचे ठरविण्यात आले.