नंदुरबार l प्रतिनिधी
अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणाऱ्या रिक्षावर विसरवाडी पोलीसांची कारवाई करत 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि . 7 ऑक्टोंबर रोजी नवापूर तालुक्यातील बिजगांव गावातुन गावटी हातभट्टीची दारु एका रिक्षामध्ये नंदुरबार करीता वाहतुक होणार आहे . अशी विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भुषण बेसाणे , पोकॉ लिनेश पाडवी , पोकॉ भोजराज धनगर , चापोना विशाल गावित , पोकॉ पिंटु पावारा अशांनी बिजगांव गावाजवळ दबा धरुन बसले असता एक पांढऱ्या रंगाची ॲपे रिक्षा ( क्र . एम.एच.३९ जे. 3936) अशी बिजगांव रोडाने नंदुरबार कडे जातांना दिसली . सदरची रिक्षा संशय आल्याने तिच्यावर अचानक 9-30 वाजता छापा टाकुन थांबविली असता रिक्षाचे सिटच्या खाली , मागच्या बाजुला काळ्या रबरी ट्युब मध्ये भरलेली गावठी हातभट्टीची दारु विनापरवाना , विनापास चोरटी वाहतुक करताना दिसली. रिक्षात एकुण 50 लिटर प्रत्येकी असे 14 रबरी ट्युब व 20 लिटीर दारु असलेला एक ट्युब मिळाले असुन एकुन 720 लिटर दारु रिक्षासह एकुण 1 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त कलेला आहे .याप्रकरणी रिक्षा चालक किसन रुपसिंग देसाई रा. बिजगांव , पोस्ट- मोग्राणी , ता . नवापुर, हरिचंद्र शंकर कोकणी , रा . बिज्यादेवी , पोस्ट- मोग्राणी , ता . नवापुर , यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध पोकॉ भोजराज धनगर यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ( ई ) , 65 ( क ) , 83 प्रमाणे विसरवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे . सदरची कारवाई हो पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे . यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .