Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
October 7, 2021
in सामाजिक
0
सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी  मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नवरात्रौत्सव, दुर्गापुजा, दसरा  हे उत्सव साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
 सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी नगरपालिका,स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती  देवीच्या मुर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
या वर्षी शक्यतो पारंपारीक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.  विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत, त्याऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम,शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.  आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी, तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 च्या ‘ब्रेक द चेन’ मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात यावेत.
देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील,इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
नगरपालिका,विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.  तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.
दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रेक्षपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये आणि कोविड-19 या संसर्गजन्य़ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यावर्षीचा नवरात्रौत्सव शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, सदर परिपत्रक नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा क्षेत्राकरीता लागू राहील कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषदेच्या पोटनवडणुकीत भाजपला फटका. जि. प.वर आघाडीची सत्ता कायम

Next Post

दारु वाहतूक करणाऱ्या रिक्षासह 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त , विसरवाडी पोलिसांची कारवाई

Next Post
दारु वाहतूक करणाऱ्या रिक्षासह 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त , विसरवाडी पोलिसांची कारवाई

दारु वाहतूक करणाऱ्या रिक्षासह 1 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त , विसरवाडी पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

June 4, 2023
तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

June 4, 2023
बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

June 4, 2023
शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

June 4, 2023
शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

June 4, 2023
महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ  सत्यशोधक सभेचे निवेदन

महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ सत्यशोधक सभेचे निवेदन

June 4, 2023

एकूण वाचक

  • 9,454 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group