नवापूर l प्रतिनिधी
भारत जोडो न्याय याञा मनिपुर, येथुन निघाली आहे.या न्याय याञेचे प्रमुख कॉग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राहुल गांधी व त्यांची टिम १० मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यात दाखल होणार आहे.
या भारत जोडो न्याय याञेचे नियोजन संदर्भात विसरवाडी येथे माजी मंञी आमदार अँड के.सी पाडवी यांच्या अध्यक्षते खाली बैठक विसरवाडी येथील अग्रवाल भवन येथे घेण्यात आली.यावेळी माजी खासदार बापू चौरे,दिलीप नाईक,धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर,गोवाल पाडवी,भानुदास गागुर्डे,अशोक सोनवणे,हरसिंग पावरा,उत्तमबापू देसले,एकनाथ गुरव,देवाजीबापू चौधरी,पंकज सुर्यवंशी,गणेश गावीत,पी एस पाटील,सिताराम राहुत,विक्रम पाडवी,पं.स सभापती बबीता गावीत,उपसभापती शिवाजी गावीत,डॉ नचिकेत नाईक,आर.सी गावीत,तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,जि.प सदस्य शैलेश वसावे, कांतीलाल गावीत,जयंत पाडवी,माजी नगराध्यक्ष दामू बि-हाडे,शहर अध्यक्ष सोहेल बलेसरीया,देवजी गावीत,प्रेमलाल वसावे ,पं.स सदस्य ललीता वसावे,अँड मनुवेल वळवी,दिलीप पवार,फैजल शेख आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मंञी आमदार अँड के.सी पाडवी म्हणाले की, भारत जोडो न्याय याञा निमित्ताने कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र राज्या मध्ये प्रवेश करणार आहेत.गुजराथ राज्यातुन नवापूर या तालुक्या मध्ये त्यांच्या प्रवेश होणार आहे यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हातील प्रमुख कार्यकरत्यांनी राहुलजी यांचे स्वागत करण्यासाठी व सभा यशस्वी करण्यासाठी सर्व कॉग्रेस पक्षाच्या पदधिकारी यांनी स्वता जवाबदारी घेऊन जनतेला सभाचे ठिकाणी घेऊन यावे असे आहवान अँड के सी पाडवी यांनी केले.यावेळी ते पुढे बोलतांना सांगितले की नंदुरबार मतदार संघा वर गांधी परिवाराने नेहमी मोठा विश्वास दाखविला आहे व मानाचे साथ दिले आहे.त्यामुळे राहुलजी गांधी चे आगमनाच्या वेळी सर्व प्रकारची तयारी झाली पाहीजे.तसेच देशा मध्ये भाजपा सरकार आदिवासीना संपविण्याचे धोरण राबवित आहे देशाचे सविधान संपविण्याचे काम मोदीसरकारने केले आहे.
त्यामुळे देशाचे सविधान धोक्यात आहे.लोकशाही धोक्यात आहे.अशा वेळी देशाचे सविधान व देश वाचविण्यासाठी आपण कॉग्रसपक्षाच्या पाठीशी उभे राहीले पाहीजे हीच वेळ आहे की देशासाठी काहीतरी चांगल करण्याची संधी आपल्या हातात आहे तेव्हा आपण सर्वानी लोकसभेच्या निवडणुकीसाठी संज्ज होऊन कामाला लागले पाहीजे असे आहवान केले.या वेळी माजी खासदार बापू चौरे,दिलीप नाईक,आर सी गावीत,शाम सनेर,ललीता वसावे,सह कॉग्रेस पक्षाच्या कार्यकरत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या बैठकीचे सुञसंचलन दिलीप पवार यांनी केले तर आभार आर सी गावीत यांनी मानले.