नंदुरबार l प्रतिनिधी
किरकोळ कारणावरुन जीवघेणा हल्ला करणा-या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास व 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील कोरिट रोड जवळ राहणारे फिर्यादी हे त्यांचे मित्र यशवंत राजपूत यांचे वेल्डींग दुकानात भेटण्यासाठी गेले असता, तेथे फिर्यादी हे ओळखत असलेल्या मोसम उर्फ मोहित उर्फ दादू मराठे रा. होळ शिवार, नंदुरबार हा दुकानासमोर आला व त्यास फिर्यादी यांचे मित्र यशवंत राजपूत यांनी वेल्डींग दुकानात काम करत असतांना सांगितले की, ” तु दारुच्या खाली बाटल्पा माझ्या दुकानाच्या मागील बाजूस टाकत जाऊ नकोस ” असे सांगितल्पाचा राग येऊन आरोपी मोहित मराठे याने यशवंत राजपूत यांच्याशी हुज्जत घालुन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व एका लाकडी दांडक्याने त्यांचे डोक्यावर जोरात मारल्याने त्यांना रक्तस्त्राव होऊन ते खाली कोसळले.
त्यावेळी तेथे उपस्थित फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी मोहित मराठे याने फिर्यादी यांचे देखील हातावर व पायावर लाकडी दांडक्याने मारहाण केली व तेथून निघुन गेला होता. त्याअन्वये शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 307, 323, 504, 506 प्रमाणे 29 डिसेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास पोउपनि प्रविण पाटील यांच्याकडे दिला. पोउपनि प्रविण पाटील व त्यांचे सहकारी पोलीस यांनी आरोपीस अटक करुन सदर
गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पधूतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते.
तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याच्या विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होतेसदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश, यु. बी.शुक्ला, नंदुरबार यांचे समक्ष झाली. सदर खटल्पामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्पाने जिल्हा व सत्र न्यायाधीश, यु.बी. शुक्ला, नंदुरबार यांनी आरोपीतास भा.द. वि.क. 325 अन्वये दोषी ठरवत दोन वर्ष कारावास व भा. द. वि.क. 324 अन्वये दोषी ठरवत एक वर्ष कारावास व रुपये 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्पाचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. बी.यु.पाटील यांनी काम पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोउपनि- राहुल भदाणे, पैरवी अंमलदार पोहेकॉ नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.