Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्राचा “कोहिनूर” हिरा हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी नंदुरबारकरांच्या कायम स्मरणात

team by team
February 24, 2024
in राजकीय
0
महाराष्ट्राचा “कोहिनूर” हिरा  हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी  नंदुरबारकरांच्या कायम स्मरणात

नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले प्रखर हिंदुत्व विचारांचे शिक्षक अर्थात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले. तत्कालीन धुळे जिल्ह्याच्या विभाजनानंतर स्वतंत्र नंदुरबार जिल्हा निर्मिती प्रक्रियेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून स्व. मनोहर जोशी नंदुरबारकरांच्या कायम स्मरणात राहतील.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेचा खरा कोहिनूर हिरा हरपला. बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय आणि निकटवर्तीय होते. तत्कालीन शिवसेना-भाजप युती शासन काळात सन 1995 ते 99 पर्यंत मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री ठरले. नंदुरबार जिल्हा निर्मितीची घोषणा दि.1 जुलै 1998 रोजी करण्यात आली होती. तदनंतर दि. 13 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्हा निर्मिती सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंढे नंदनगरीत आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य सोहळा झाला.

सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदुरबारच्या माणिक चौकातील हुतात्मा स्मारकास भेट देऊन बाल शहिदांना अभिवादन केले होते. याप्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गोपीनाथ मुंढे या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. महादू हिरणवाळे यांच्याकडून नंदुरबारच्या बाल शहिदांविषयी जोशी आणि मुंढे यांनी माहिती जाणून घेतली.

तब्बल 26 वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्हा निर्मितीनिमित्त नंदुरबार शहरात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची दुर्मिळ भेट आजही हृदयात कायम आहे. सन 1997 ला युती शासनाच्या काळात शिवशाही आपल्यादारी हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबई दूरदर्शन वरून प्रसारित होत असे. याच कार्यक्रमात तत्कालीन धुळे जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील पत्रकार म्हणून महादू हिरणवाळे यांचा सक्रिय सहभाग होता.

या कार्यक्रमात महादू हिरणवाळे यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळचा विकास महाबळेश्वर प्रमाणे व्हावा असा प्रश्न उपस्थित केला होता. याच कार्यक्रमात तत्कालीन पर्यटन मंत्री ठाण्याचे आमदार जगन्नाथ पाटील उपस्थित होते. तर सन 1999 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण प्रश्न गाजत असताना खुद्द मुख्यमंत्री मनोहर जोशी हेलिकॉप्टरद्वारे थेट मुंबईहून सातपुड्यात दाखल झाले होते. या आठवणी आजही आदिवासी बहुल भागातील नंदुरबारकरांच्या स्मरणात आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

एस ए.मिशन महाविदयालयात शालेय शिक्षकांचे एचआयव्ही संदर्भात संवेदिकरण कार्यशाळा

Next Post

नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आज भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add