नंदुरबार l प्रतिनिधी
येथील एस ए.मिशन महाविदयालयात शालेय शिक्षकांचे एचआयव्ही संदर्भात संवेदिकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या सौजन्याने राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण विभाग नंदुरबार यांचे मार्फत युवा वर्ग हा एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून त्यानिमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाँ.अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नरेश पाडवी व अती.जिल्हा शल्यचिकित्सक डाँ.के डी सातपुते , जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली एस.ए.मिशन हायस्कुल येथे शहरातील शाळा ,विदयालयाचे शिक्षक यांचे एचआयव्ही,एड्स संवेदिकरण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
यात जिल्हयातील डि.आर हायस्कुल, श्रॉफ हायस्कुल, नूतन कन्या हायस्कुल, एकलव्य विदयालय, जी.टी.पी महाविदयालय व मिशन हायस्कुल येथील प्राध्यापक , शिक्षकांनी सहभाग घेतला यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलीक यांनी जिल्हाभरात एचआयव्ही/एड्सचे कार्य कसे चालते तसेच एचआयव्ही/एड्स तपासणी का करावी त्याचे फायदे कार्य तसेच आपल्या क्षेत्रात कार्य करतांना लोकाना एचआयव्ही/एड्स माहीती देणे तसेच आपला जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने सर्व घटकापंर्यत जनजागृती करणे याबद्यल मार्गदर्शन केले तसेच जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सुर्यवंशी यांनी गरोदर माता तपासणी, उपचार, एआरटी औषधोचार याविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सर्व सहभागी प्रशीक्षणार्थी शिक्षक यांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलीक व एस.ए.मिशन हायस्कुलचे प्राचार्य .श्रीमती नुतनवर्षा वळवी तसेच उपमुख्याध्यापक विजय पवार, इतर सर्व शिक्षक हस्ते प्रमाणपत्र प्रदान केले सदरचे प्रशिक्षणासाठी नरेंद्र सुलक्षणे, सोमनाथ वायफळकर, जितेंद्र सुर्यवंशी, साजीद अन्सारी सुभाष निकम आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.