Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लवकरच स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक स्थापन करु: खा. डॉ. हिना गावित यांची घोषणा

team by team
February 21, 2024
in राजकीय
0
लवकरच स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक स्थापन करु: खा. डॉ. हिना गावित यांची घोषणा

 

नंदुरबार l प्रतिनिधी
बचत गट किंवा वैयक्तिक स्तरावर वस्तू उत्पादन करून त्याचे स्टॉल लावणाऱ्या तुम्ही सर्व महिला अन्य इतर सर्व महिला घटकांसाठी रोल मॉडेल आहात; अशा शब्दात बचत गटातील महिलांच्या कार्याचे कौतुक करतानाच महा संसद रत्न पुरस्कार प्राप्त खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितले की, महिला बँकेच्या माध्यमातून यापुढे सर्व महिला बचत गटांच्या आर्थिक समस्या सोडविणे सोपे जावे, या हेतूने आगामी काळात स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक म्हणजे महिलांची बँक नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थापन करण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत.

 

 

 

 

अंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी सहाय्यीत महिला आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) आणि प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, नंदुरबार अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षीमीकरण कार्यक्रम आणि वार्षिक सर्वसाधारण सभा नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

 

 

 

 

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित, नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल , राकेश वाणी,कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, राजेंद्र दहातोंडे, केव्हीके संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, दिनेश सूर्यवंशी, व्यवस्थापक,DIC. कांतागौरी बनकर.,वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, मविम, संदीप बछाव,ICICI, दीपक ढाकणे,MCED, विजय मोहिते,PMFME, विजय सैदाने , अल्पसंख्याक महामंडळ, दीपमाला पाटील,अध्यक्ष प्रेरणा, कौलश्या वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

प्रारंभी या सर्व मान्यवरांनी बचत गटांनी लावलेल्या स्टाॅलला भेट दिली. खा. डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला.

 

 

 

खा. डॉ. हिना गावित भाषणात पुढे म्हणाल्या, मोदीजींनी तयार केलेल्या योजनेचा लाभ घेत महिला सुद्धा सक्षम होत आहेत. ज्या महिलांनी आज पीएम एफ च्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू तयार करून इथे स्टॉल लावले ते आज इतर अनेक महिलांसाठी एक उदाहरण, एक रोल मॉडेल बनल्या आहेत. तुमच्याकडे बघून बऱ्याच महिलांना या ठिकाणी प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे.

 

 

 

जेव्हा आपण एखादी वस्तू बनवतो त्या विकायचा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो. फ्लिपकार्ट वगैरे सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म इथे नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

 

 

ज्याच्यावरनं वस्तू आपण विकत घेऊ शकतो किंवा ऑनलाईन त्या ठिकाणी विकू शकतो, असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवणार असून त्या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही. अशी व्यवस्था करणार आहोत, असे खा. डॉ. हिना गावित म्हणाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत योजनांची माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा: मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित

Next Post

लोकशाही पॅनलच्या प्रचारफेरीस नंदुरबार तालुक्यातील गावांना जोरदार पाठिंबा

Next Post
लोकशाही पॅनलच्या प्रचारफेरीस नंदुरबार तालुक्यातील गावांना जोरदार पाठिंबा

लोकशाही पॅनलच्या प्रचारफेरीस नंदुरबार तालुक्यातील गावांना जोरदार पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add