नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यात सांगली जिल्हा परिषद गटातल्या विविध गावांमधे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित व महा संसद रत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या प्रयत्नाने करण्यात आलेल्या जल योजना, रस्ते, पेव्हरब्लॉक आदी दहा कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचा सोहळा खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते पार पडला.
अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या गावांना ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ता काँक्रीटी करण करणे, सोलर लाईट बसविणे, प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजने अंतर्गत अंगणवाडी कंपाऊंड करणे, प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटी करण करणे, जलजिवन मिशन अंतर्गत जलकुंभ उभारणे, जलजिवन मिशन अंतर्गत पाईप लाईन करणे अशा विविध कामांचे लाभ देणे खा.डॉ.हिना गावित व आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी शिरपूर तालुक्यात सुरू ठेवले आहे. विकास कामांचा चालू ठेवलेला हा धडाका पाहून शिरपूर तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे.
काल दि. 13 फेब्रुवारी रोजी देखील खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते एकाच वेळी सहा गावांमध्ये लागोपाठ या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे पार पडले. यात सांगवी जिल्हा परिषद गटातील मौजे गावातील 58.48 लक्ष रुपयांची 5 कामे, मौजे पनाखेड गावातील एक कोटी 52 लाख 7 हजार रुपये खर्चाची 9 कामे, मौजे खैरकोटी गावातील 11 कामे, मौजे खांबाळे गावातील एक कोटी 63 लाख 4 हजार रुपये खर्चाची 7 कामे, जोयदा गावात दोन कोटी 53 लाख खर्चाची 9 कामे, सांगवी गावातील एक कोटी 34 लाख रुपये 64 हजार रुपये खर्चाची 9 कामे यांचा त्यात समावेश आहे.
भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खा.डॉ.हिना गावित यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी तालुकाप्रमुख राहुल रंधे, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सांगवी गटाचे जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, भाटपुरा जिल्हा परिषद गटाचे सदस्य संजय पाटील, सभापती कैलास पाटील, आदिवासी आघाडी प्रमुख जयवंत पाडवी, बोराडी जि प सदस्य रमण पावरा, पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे, प्रभा कोकणी, कमला पावरा, लताबाई पावरा, त्याचप्रमाणे संबंधित गावातील सरपंच उपसरपंच आणि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे आणि महिलांची समस्या सोडवावी म्हणून प्रत्येक गावाला जलजीवन मिशन योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्या माध्यमातून घराघरात नळ पाणी योजना पोचवली जात आहे. आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने आणि केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार दिला जात आहे.
दलित ओबीसी आणि आदिवासी अशा प्रत्येक घटकातील बेघरांना घरे देणे तसेच प्रत्येकाला गॅस आणि तत्सम लाभ देणे मोदी सरकारने चालू ठेवले असून प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा; असे आवाहन याप्रसंगी खा.डॉ.हिना गावित यांनी भाषणातून केले त्याचप्रमाणे जून नंतर प्रत्येक गाव आणि पाढे बारमाही रस्त्याने जोडले जातील त्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना अमलात आणली आहे असेही खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या