म्हसावद l प्रतिनिधी
खेतिया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे सार्वजनिक जागी एक लाख रूपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला असून म्हसावद पोलीसांनी आरोपीस अटक करून गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहिती अशी की ,म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे , यांना गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहिती नुसार , पो. ह. बहादूर भिलाला, पो. ना. दादाभाई साबळे, पो. शि. राकेश पावरा , पो. शि. सचिन तावडे यांनी सापळा रचून खेतिया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे 8 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक जागी काळया रंगाची ॲपे रीक्षा ( MH-18-BH -1484) आढळून आली.
रिक्षात तपणी केली असता त्यात 1 लाख 896 रुपये किमतीचा एकूण पाच निळ्या रंगाच्या मोठया गोण्या त्यात प्रत्येकी 52 केसर युक्त विमल पान मसाला गुटक्याचे पाऊच असे एकूण 260 पाऊच ,पांढऱ्या रंगाचे एकूण पाच गोण्या प्रत्येक गोणी मध्ये 52, V1 तंबाखूचे पाऊच एकूण 260 पाऊच,तीन पांढऱ्या रंगाच्या मोठया गोण्या त्यात 60 खोके त्यावर “बोलो जुबॉ केसरी” असे लिहिलेले याचेसह 3 लाख रुपये किमतीची काळया रंगाची ॲपे रीक्षा ( MH-18-BH -1484) असा एकूण 4 लाख 896 हजाराची मुद्देमाल जप्त केला आहे.संशयित आरोपी फैजान मोहम्मद सिराज अन्सारी(21)रा.आझादनगर,वडझाई रोड धुळे याला अटक केली आहे.
याप्रकरणी तपास म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत.
यातील आरोपी याने स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर रित्या मानवी जीवितास अपायकारक व हानिकारक महाराष्ट्रात प्रतिबंधित विमल गुटखा व पान मसाला छापा कारवाई दरम्यान स्वतःच्या ताब्यातील वाहन ॲपे रिक्षा मध्ये वाहतूक करताना व जवळ बाळगताना मिळून आला म्हणून म्हसावद पोलीस ठाण्यात भा.द.वि.सह कलम 26 (2) (4) 30 (2)(ए) अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 गुन्हा नोंद केली आहे.