Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा : जिल्हाधिकारी सावन कुमार

team by team
January 31, 2024
in राज्य
0
100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा : जिल्हाधिकारी सावन कुमार

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 75 हजार 337 पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 6 शिधाजिन्नसांचे संच असलेला ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

 

 

जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 100 रुपयांत एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे 6 शिधाजिन्नस संच मिळणार आहेत. गोरगरीब कुटूंबीयांसाठी हा आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे.

 

 

 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. सद्याच्या दिवसांत खाद्यतेल, डाळी, साखरेचे भाव वाढले की, सर्वसामान्य कुटूंबांची अडचण होते. याबात मंत्रिमंडळ निर्णय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिली आहे.

 

 

हे असतील पात्र
अंत्योदय, प्राधान्य कुटूंब, पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असून आनंदाचा शिधा वाटपासाठी जिल्ह्यात पुरेसा धान्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयात रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा हे 6 शिधाजिन्नस संच मिळणार आहे. हे साहित्य खुल्याबाजारात किमान 300 ते 350 रुपयांचे आहे.

 

 

 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वितरीत करावयाचा संच 22 जानेवारी 2024 पासुन सुरू झाला असून 29 फेब्रूवारी 2024 पर्यंत तो मिळू शकेल. जिल्ह्यातील 2 लाख 75 हजार 337 पात्र कुटूंबाना आनंदा शिधा वाटपाचा लाभ मिळणार आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील रेशनकार्डधारक कुटूंबांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ थेट रेशन दुकानांमधून मिळणार आहे. हे संच पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतील. जिल्हयातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारक लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातुन ‘आनंदाचा शिधा’ संच प्राप्त करुन घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

 

 

दृष्टिक्षेपात वितरण
🎁 नंदुरबार : 56 हजार 619
🎁 नवापूर : 52 हजार 322
🎁 शहादा : 65 हजार 500
🎁 तळोदा : 30 हजार 030
🎁 अक्कलकुवा : 42 हजार 878
🎁 अक्राणी : 27 हजार 988
🎁 एकूण : 2 लाख 75 हजार 337

बातमी शेअर करा
Previous Post

नवापुर-पुणे बसचा भीषण अपघात 22 प्रवासी गंभीर जखमी

Next Post

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add