नंदुरबार l प्रतिनिधी
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार व जे.आय.आय.यु. संचलीत अली अल्लाना ऑफ फार्मसी अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता जे.आय.आय.यु. संचलीत अली अल्लाना ऑफ फार्मसी अक्कलकुवा येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवून रिक्तपदे अधिसूचित केली असून दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीका आदी विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही सहायक आयुक्त श्री. रिसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.








