नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार एस ए मिशन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक संमेलन झाले. नंदुरबार येथील ए. ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उडान हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
नर्सरीच्या विद्यार्थ्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात देशातील विविध प्रांतातील लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. देशात थैमान घातलेल्या कोरोना, शेतकरी, फौजी, भारतीय संस्कृतीचे विविध पैलूंचे या माध्यमातून आनंद पालकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते, या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अनिल गवांदे, डायटचे प्राध्यापक बाबासाहेब बडे, आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, संस्थेचे चेअरमन जे. एच. पठारे, कार्यकारी संचालक डॉ राजेश वळवी, व्हाईस चेअरमन संतोष देशपांडे, संचालक तथा प्राचार्य सौ. नूतनवर्षा वळवी, संचालक मार्था सुतार, अनुप वळवी, सौ प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुषमा काळू, शहाद्याचे मुख्याध्यापक समद नाथानी, तळोदा मुख्याध्यापिका चंदना नाथानी, मुख्याध्यापिका डॉ.सुनिता अहिरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदेश यंगड, शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर, पर्यवेक्षिका रोहिणी वळवी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन वरील पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संदेश यंगड यांनी शाळेचा इतिहास सांगितला, तसेच शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच हायस्कूल विभागाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सुनिता अहिरे यांनी शाळेचा इतिहास सांगून शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची, स्मार्ट क्लास ची माहिती दिली. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केजी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाची थीम उडान होती. यामध्ये भारतीय सिनेमा, खेळ, शिक्षण, महिलांनी केलेली प्रगती, सांस्कृतिक तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित सर्व कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिसेस फरहाना शेख, मिस. धनश्री गिरासे यांनी केले,

तर आभार प्रदर्शन प्रायमरीच्या पर्यवेक्षिका मिसेस. रोहिणी वळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर. सुनिता अहिरे, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक सदेश यंगड यांनी परिश्रम घेतले. तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक जयकर, सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख सत्यजित नाईक आणि सदस्य तसेच शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








