नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीवानांना त्यांच्या शिक्षेचा कालावधी, कोर्टाची तारीख यासह इतर बाबी तत्काळ माहिती व्हावी यासाठी कारागृहात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होईल अशा पद्धतीचे टीएस किओसॉक मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रणालीचा शुभारंभ न्या.डी.व्ही.हरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

नंदुरबार जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, अमिताभ गुप्ता (भा.पो.से.) व विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय, पुणे डॉ. जालिंदर सुपेकर, तसेच कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर यु. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाने उपलब्ध झालेले ई-प्रीजोन अंतर्गत टीएस किओसक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेमुळे बंदीवानांना एका क्लीकवर त्यांच्या स्वतःची, त्यांच्यावर असलेल्या केसेसची संपूर्ण माहिती, कोर्टातील सुनावणी तारीख, नातेवाइकांसोबत मुलाखत बाबत संदेश, कोर्टात प्रकरण कोणत्या ठाण्यात आहे ही माहिती तत्काळ उपलब्ध होते. ज्यावेळी बंदिवान कामासाठी बराकी बाहेर काढले जातात त्यावेळी ते कधीही माहिती घेऊ शकतात.
या टीएस किओसॉक मशीनचा शुभारंभ न्या.डी.व्ही.हरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळीस कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, संदिप चव्हाण, तुरुंगाधिकारी आर. व्ही. कोष्टी, प्रशासन अधिकारी, ॲड. श्रीमती सीमा खत्री आदी कर्मचारी व कारागृहातील बंदी उपस्थित होते.








