नंदुरबार l प्रतिनिधी-
‘एक से बढकर एक’ उखाण घेत सौभाग्याचं लेणं असलेल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या योजनातून उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील ७ हजार पेक्षा अधिक भगिनींना तिळगुळासह भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या डोममध्ये महिला भगिनींच्या उपस्थितीत हळदी कुंकवाच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुपारी ३ वाजेपासून सुरू झालेला कार्यक्रम रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या संयोजनातून दरवर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. दुपारी ३ वाजेपासून शहरातील महिलांनी गटागटात येऊन हळदी कुंकू सहभाग घेतला. ‘सखे राहो सौभाग्य अक्षय्य तुझे ‘ अशा एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत महिलांनी हळदी कुंकू दिला.त्यांनतर त्यांना वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी उपस्थित अनेक महिलांनी उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली. प्रसंगी मेघा राम रघुवंशी, शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाप्रमु ज्योती राजपूत,माजी सभापती मनीषा वळवी,माजी नगरसेविका भारती राजपूत,जागृती सोनार,स्मिता दिघे,सोनिया राजपूत,ज्योती पाटील, लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा वैशाली पाटील,राजश्री ठाकरे यांच्यासह शहरातील विविध महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होते.








