नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम अंतर्गत 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मानवी साखळी (Human Chain) तयार करणे. तसेच सामुहिक शपथ घेणसाठीचा कार्यक्रम नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास नंदुरबार जिल्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार, नंदुरबार प्रांत अधिकारी विनायक महामुनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विज्ञान निरीक्षक रविंद्र पाटील, विस्तार अधिकारी शरद पाटील, जयंत चौरे, मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कला शिक्षकांच्या पथकाने 3500 विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करुन नंदुरबार जिल्हयाच्या नकाशा निवडणूक आयोगाचे चिन्ह तसेच Vote For Nandurbar असे अक्षर रेखाटुन विद्यार्थ्यांमध्ये व पर्यायाने पालकांमध्ये मतदानाविषयी व निवडणूकांविषयी जागृती निर्माण करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तीरंगी फुगे मान्यवरांच्या हस्ते आकाशात उडवुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर (SVEEP) अंतर्गत पतंगोत्सव, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच मानवी साखळी तयार करण्यासाठी सहकार्य केलेल्या प्राचार्य व कला शिक्षकांचा यशोचित सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या समवेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडुन राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती संबंधी शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक राजेंद्र ठाकुर, चंद्रशेखर चौधरी, आनंदराव पवार, देवेंद्र कुलकर्णी, संतोष पाडवी, प्रकाश सोनवणे, सिध्दार्थ माळी, नरेंद्र सरोदे, महेंद्र सोमवंशी, किरण कुवर, दिपक माळी, इसरास सैय्यद, निलेश भावसार यांनी परिश्रम घेतले.








