नंदुरबार l प्रतिनिधी-
वंदे मातरम सेवाभावी संस्था धुळे संचलित श्री संत दगा महाराज प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय उमर्दे बु.येथे स्नेह संम्मेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु.येथील वंदे मातरम सेवाभावी संस्था धुळे संचलित संत दगा महाराज प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय उमर्दे बु.येथे वार्षिक स्नेह संम्मेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित होत्या.यावेळी नंदुरबार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शरद पाटील, जयंत चौरे, सतीश कदमबांडे, सचिन गोसावी,सुभाष पाटील, संजय पाटील, शीलवंत वाकोडे, केंद्रप्रमुख हिरामण वाघ ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुणजी हुमणे, नंदुरबार नगरपालिका चे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी, आनंदभाऊ माळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक नितिन पाटील व मुख्याध्यापिका सौ.अर्चना पाटील यांच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित व उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ रामायण ग्रंथ तसेच नंदुरबार चे लोकप्रिय लेखक वासुदेव पाटील लिखित हिरवा चुडा कादंबरी व विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेल्या भाज्या देऊन स्वागत करण्यात आले.
तद्नंतर वर्षभरात विविध शालेय उपक्रमात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. चेअरमन यांच्य वतीने शिक्षिका गटातून आदर्श शिक्षिका श्रीमती ज्योती परदेशी तर शिक्षक गटातून समाधान पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.राम आएंगे या गाण्यावर सादर करण्यात आलेला जिवंत देखावा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.सदर कार्यक्रमात विनोदी व मूक नाटीका सह हिंदी,मराठी
बंजारा,आदिवासी,देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी आपला प्रबोधनात्मक कलाविष्कार सादर केला.पुतळा विटंबना अर्थातच सर्वधर्म समभाव या मूक नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती परदेशी व योगेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक समाधान पाटील यांनी केले,या कार्यक्रमास उमर्दे गावाचे सरपंच-उपसरपंच व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात डॉ.सुप्रिया गावित यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे शालेय जीवनात आयोजन महत्वाचे असून संस्थेला सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या सह संस्थेतील सर्वच शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. व पाहुण्यांचे आभार मानले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.