नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट),छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने कोपर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिरात 1 हजार 79 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.जिल्ह्यातील तसेच परिसरातील ग्रामस्थांनी शिबिराच्या लाभ घेतला.
नंदुरबार येथील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तर्फे नुकतेच कोपर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,मजूर फेडरेशनचे अध्यक्ष अंकुश पाटील,अनिल गिरासे, बाजार समिती संचालक नवीन बिर्ला,किशोर पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व गावाचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.रोशन भंडारी, डॉ योगेश्वर चौधरी डॉ. त्रंबक पटेल,,डॉ.चेतन सूर्यवंशी, डॉ सुरेंद्र पाटील, डॉ.कपिल दुसेजा,डॉ चेतना जैन,डॉ.शामल जैन यांनी रुग्णाची तपासणी केली तर त्यांना छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.कांतालक्ष्मी डोळ्यांचे हॉस्पिटलचा पथकाने डोळ्यांची तपासणी तर आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय पथकाने सिकलसेलची तपासणी केली.
आरोग्य सेवेतून कोणीही वंचित राहू नये
शिबिराच्या माध्यमातून रुग्ण बांधवांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली.रुग्ण सेवेतून कोणीही वंचित राहू नये.जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची निर्मिती केली.शासनाच्या सर्व आरोग्याच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
ॲड. राम रघुवंशी,जिल्हा प्रमुख शिवसेना
या आजारांवर तपासणी
मेंदूचे आजार,लखवा, मुत्ररोग, छाती,पोट,हाडाच्या मणक्याचे आजार,सिकलसेल, कुष्ठरोग,किडनी,कर्करोग, टि.बी,मूळव्याध, कान, नाक, घसा आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.