नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार व तळोदा येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत 50 शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यात 153 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. नंदुरबार येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
किशोरी मुलींना अनेक समस्यावर मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते.मेट्रोपोलीस फाउंडेशन व भारत केअर्स यांच्या सहकार्याने नंदूरबार व तळोदा येथे ‘स्वास्थ्य सहली अंतर्गत किशोरी मुलीं पर्यंत पोहोचून मार्गदर्शन करीत आहे.त्या अंतर्गत स्वास्थ सहेली तर्फे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा 50 शाळेत घेण्यात आल्या.या चित्रकला स्पर्धेत 153 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
नंदुरबार येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय बालिका दिनी करण्यात आला.यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी साईनाथ वंगारी, महिला व बालकल्याण विकास विभागाचे विस्तार अधिकारी शंकर निकाळजे, भारत केअर्सच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती निशिता मेहता, मुख्याध्यापक निंबा माळी उपस्थित होते.
यावेळी श्री वंजारी यांनी सांगितले की, बाल कल्याण विभागाच्या वतीने बाल संगोपन योजना सारख्या अनेक योजना राबवत आहे. महिलांनी सक्षम व्हावे महिलावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अनेक कायदे करण्यात आले आहेत. गर्भलिंग चाचणी, हुंडाबंदी आदी कायदे केले आहेत. असे सांगत किशोरीना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना मुख्याध्यापक निंबा माळी यांनी केली. भारत केअरच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती निशिता मेहता यांनी स्वास्थ स्वास्थ्य सहली अंतर्गत आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत विजयी प्रथम क्रमांकाने श्री डोंगऱ्या देव माध्यमिक विद्यालय, कोकणीपाडा येथील विद्यार्थिनी 1) पुनम धनसिंग नाईक,2) अश्विनी सुरुपसिंग वळवी,3)सिमरण वळवी,4) रितु कांबळे या विद्यार्थिनींना विजयी झाल्या.त्यांना शिक्षक कीर्तीवर्धन तायडे यांचे मार्गदर्शन लाभले.
द्वितीय क्रमांक श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भालेरच्या विद्यार्थिनी – भाविका विनोद पाटील,रावी प्रवीण पवार या विजयी झाल्या त्यांना शिक्षक मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले,
तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय, ढेकवदच्या
विद्यार्थिनी 1) दिव्या श्रावण मावची, 2) सुहाना राजेश पाडवी, 3) वैष्णवी दिनेश वसावे विजयी झाले.या विजयी विद्यार्थिनींना बालविकास प्रकल्प अधिकारी, नंदुरबारचे साईनाथ वंगारी, विस्तार अधिकारी शंकर निकाळजे, भारत केअर्सच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती निशिता मेहता यांच्या हस्ते ट्रॉफी, सर्टिफिकेट व आरोग्य किट देऊन गौरविण्यात आले.
सुत्रसंचलन निकिता टेकाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रद्धा उतेकर,दिव्या चुडासमा,राधा वाघमारे,पुजा भताने,जयश्री कोळी यांनी परिश्रम घेतले.