नंदुरबार l प्रतिनिधी
शहर व जिल्ह्यात शांतीचा संदेश देत कायम शांती प्रस्थापित करणाऱ्या प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचेे कार्य कौतुकास्पद आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्यात ओम शांती परिवाराचे कार्य अजून मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी लवकरच भव्य ओम शांती भवन उभारण्यात येईल. दिवंगत विजया दीदी यांचे कार्य समाजा साठी प्रेरणा दायी ठरावे यासाठी प्रस्तावित ओम शांती भवनाला विजयदीदी यांचे नाव देणार असल्याचा संकलप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नंदुरबार केंद्र संचालिका बीके विजयादीदी यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत होते.
इंदिरा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नंदनगरीतील भक्तांसाठी शिवधाम मंदिर उभारण्याकरीता निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे ओम शांती परिवाराच्या भव्य भवन उभारणी साठी प्रयत्नशील असून लवकरच हा संकल्प पूर्ण करणार असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख रवींद्र पवार उपस्थित होते.
या समारंभास पुणे सबझोनच्या प्रमुख संचालिका बीके पारू दीदी,सासवड केंद्र संचालिका बीके निलीमादिदी, सांगवी केंद्र संचालिका बीके संजीवनी दीदी, शहादा केंद्र संचालिका बीके विद्यादीदी उपस्थित होत्या.
यावेळी दिवंगत विजया दीदी यांच्या निधनानंतर नंदुरबार केंद्र मुख्य संचालिका म्हणून ब्रह्मकुमारी योगितादीदी आणि उपसंचालिका म्हणून ब्रह्मकुमारी वर्षादीदी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी दिवंगत विजया दीदी यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके शिलादीदी यांनी केले. या समारंभास नंदुरबार जिल्ह्यासह नजीकच्या मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या भगिनी तसेच साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








