नंदुरबार l प्रतिनिधी-
आयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परिसरातील भालेर, नगाव, काकर्दे, शिंदगव्हाण ,उमर्दे खुर्दे आदी गावात घरोघरी गुढी उभारून अंगणात रांगोळी काढण्यात आली . मंदिर परिसरात,चौकात भगव्या पताका लावून घरोघरी भगवे झेंडे लावण्यात आले.
भालेर ता. नंदुरबार येथे शोभायात्रा काढण्यात आली यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषेतील मुलांची ट्रॅक्टर बसून संपूर्ण गावात शोभायात्रा काढण्यात आली. डी .जे .च्या तालावर तरुणाईने ठेका धरला जय श्रीराम यांच्या उद्घोषाने परिसर भक्तीमय झाला येथील राम मंदिरावर सायंकाळी महाआरती झाल्यावर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नगाव ता. नंदुरबार येथेही संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली ग्रामस्था तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. काकरदे ता. नंदुरबार येथे शोभा यात्रा काढण्यात आले सायंकाळी महाआरती करण्यात आली ग्रामस्था तर्फे भंडाराच्या आयोजन करण्यात आले होते. शिंदगव्हान ता. नंदुरबार येथील श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाईने करण्यात आली होती, आदल्या दिवशी ग्रामस्थातर्फे साफसफाई अभियान राबविण्यात आले. गावात घरोघरी घोड्यावर रांगोळी काढण्यात आली, मंदिरावर व घरोघरी दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणून महाआरती करण्यात आली.

ग्रामस्थ तर्फे भंडाऱ्याच्याचे आयोजन करण्यात आले होते.
उमर्दे खुर्दे ता. नंदुरबार येथे संपूर्ण गावात गुढी उभारून घरोघरी घरापुढे रांगोळी काढण्यात आली, घरोघरी भगवे झेंडे लावण्यात आले . संपूर्ण गावातून पालखीतून श्री रामाच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लहान मुले, मुली, पुरुष महिलांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. शोभा यात्रेनंतर विठ्ठल मंदिरावर ६-१२-१९९२ रोजी अयोध्या येथे कारसेवेसाठी गेलेले दिलीप गणपत कदमबांडे, अर्जुन भाईदास पेटकर, सुरेश संपत घेवारे व दिवंगत पांडुरंग नारायण कदमबांडे,विजय शामराव शिंदे भिका मल्हारी मव्हाळ,सुरेश ठाणसिंग गिरासे यांच्या कुटुंबीयांचे सह उमर्दे येथील ३७ कारसेवकांचा ग्रामस्था तर्फे सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कुटे यांनी केले .महाआरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. उमर्दे येथे नियोजित जागेवर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी यावेळी उपसरपंच सागर साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य कैलास भिल, कमलेश चौधरी, निंबा रावडे, भिला जमादार, संदीप कदमबांडे, नारायण कदमबांडे सह ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.








