नंदुरबार l प्रतिनिधी
अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्माण व सोहळ्यानिमित्त रघुवंशी समाजाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आले. शोभायात्रेत समाजातील महिलांनी कलश डोक्यावर घेत प्रभू रामनामाच्या जयघोष केला.
नंदुरबार शहरात ठीक ठिकाणी चौकाचौकांमध्ये प्रतिमा पूजनासह शुभायात्रा काढण्यात आल्या. सकाळी ११ वाजता परदेशीपुरा येथून रघुवंशी समाजातर्फे शोभायात्रा काढण्यात आली. समाजातील महिलांनी डोक्यावर कलश घेत सहभाग घेतल्याने आकर्षण ठरले. डी.जे,ढोल ताशांवर युवकांनी नृत्य केले. यात युवतीही मागे नव्हत्या त्याचप्रमाणे पालिका चौकात महिलांनी गरबा खेळून आनंदोत्सव साजरा केला. परदेशी पुऱ्यातून निघालेली शुभायात्रा,आमदार कार्यालय, पालिका चौक, स्टेशन रोड, डॉ. हेडगेवार रोड मार्गे, परदेशीपुरा येथील राम मंदिरात पोचली.
मंदिरात शोभायात्रा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
प्रसंगी उद्योगपती पृथ्वीराज रघुवंशी, तालुका विधायक समितीचे व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी,उद्योगपती पुष्पेन्द्र रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ऍड. राम रघुवंशी,अशोकसिंह रघुवंशी, महेंद्रसिंह रघुवंशी,माजी नगरसेवक राजेश रघुवंशी, डॉ.तुषार रघुवंशी,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,माजी सभापती निखिल रघुवंशी,भाजपचे सदानंद रघुवंशी,माजी सभापती अमित रघुवंशी आदी समाज बांधव उपस्थित होते.