Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाज आयोजित “राम जानकी” यात्रेला उदंड प्रतिसाद; महिलांचाही उल्लेखनीय सहभाग

team by team
January 22, 2024
in राजकीय
0
खा. डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात सकल  हिंदू समाज आयोजित “राम जानकी” यात्रेला उदंड प्रतिसाद; महिलांचाही उल्लेखनीय सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून असलेल्या अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला महा संसद रत्न खा. डॉ. हिना गावीत यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ‘सकल हिंदू समाज’ आयोजित राम जानकी यात्रेत आणि बाईक रॅलीत हिंदुत्वासाठी कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी तसेच पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह नंदुरबार शहरातील शेकडो युवक युवतींनी सहभाग घेत प्रचंड प्रतिसाद दिला. खा.डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात महिलांनी आणि युवतींनी घेतलेला विशेष सहभाग या रॅलीतील आकर्षण बिंदू ठरला.

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघी नंदनगरी भगव्या ध्वजांनी नटलेली दिसली. सदर बाईक रॅली चे आयोजन सकल हिंदू समाज अवध राम मंदिर निर्माण समिती, नंदुरबार द्वारे करण्यात आले. राम सीता लक्ष्मण यांचा जिवंत देखावा युवकांचा उत्साह द्विगुणित करताना दिसला. खा.डॉ.हिना गावित यांनी राम जानकी रथाला भावपूर्ण नमन करून सर्व उपस्थितांना अयोध्येतील सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शहरातील प्रत्येक रस्त्यावर जागोजागी तसेच बाईक रॅलीच्या मार्गावर देखील जागोजागी लावलेले भगवे ध्वज लक्ष वेधून घेत होते. नंदुरबार शहरातील मोदी ग्राउंड वरून खा.डॉ.हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. सुरू झालेल्या बाईक रॅली दरम्यान प्रत्येकाच्या हातात आणि प्रत्येकाच्या दुचाकी वर भगवे ध्वज फडकत होते.

‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी जणू शहर दुमदुमून गेले. शहरातील उड्डाणपूल मार्गे गांधी पुतळा, दीनदयाळ चौक , D.R. हायस्कुल येथून सुरवात होवून , जुनी नगर पालिका, नेहरू पुतळा, गांधी पुतळा, उड्डाणपूल, गिरीविहार, कोरिटनाका, करणं चौफुली, मोदी ग्राउंड, सिंधी कॉलनी, उड्डाणपूल, महाराष्ट्र व्यायाम शाळा , सोनार खुंट, जळका बाजार , मोठा मारुती येथे सांगता व सामूहिक रामरक्षा पठण करून विसर्जित करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून अभूतपूर्व ऐतिहासिक मोटरसायकल रॅली

Next Post

सकल हिंदू समाज आयोजित पदयात्रेत खासदार व झेडपी अध्यक्षांसह महिलांचा अद्भुत जल्लोष; कार सेवकांचाही भावपूर्ण सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add