नंदुरबार l प्रतिनिधी
अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील राम मंदिरांमध्ये जय्यत करण्यात येत आहे. स्वच्छतेसह रंगरंगोटींवर भर देण्यात आलेला आहे. नेहरू पुतळा परिसरातील रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिरात रंग काम पूर्णत्वास आलेले आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शहरातील राम मंदिरांमध्ये उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे तयारी जवळपास पूर्णत्वास आलेली आहे.
परदेशी पुऱ्यातील राम मंदिर, देसाईपुऱ्यातील संतांचे राम मंदिर, शिवाजी रोड परिसरातील यार्दिंचे श्री राम मंदिरात उद्या सोमवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.नेहरू पुतळा परिसरातील रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिरात रंग काम पूर्णत्वास आलेले आहे. या मंदिरात सकाळपासूनच सजावटीचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले.