नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील देसाई पुरा भागात सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वीचे संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले.
सोमवारी अयोध्या येथे श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश भरातील सर्व मंदिरांमध्ये शनिवार पासून स्वच्छता अभियान सुरू आहे.
त्यानुसार नंदुरबार शहरातील विविध मंदिरांमध्ये देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देसाईपुरा भागात सुमारे सव्वा चारशे वर्षपासून उभारण्यात आलेले पुरातन संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले. अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार शहरातील विविध मंदिरात जाऊन स्वतः स्वच्छता अभियान राबविले.
त्याचबरोबर महा संसदरत्न खा. डॉ. हिना गावित यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील सर्व मंदिरांना विद्युत दिव्यांच्या माळा आणि महाप्रसाद मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मंदिर संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला. दरम्यान मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सर्वात जुन्या श्री संतांचे राम मंदिराची माहिती जाणून घेतली.मंदिरात प्रवेश केल्याबरोबर ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी पुरातन श्रीराम मंदिराच्या वास्तूची पाहणी केली.तसेच मंदिराच्या गाभार्यात स्वस्ते स्वच्छता अभियान राबविले. त्यानंतर मंदिराचे ट्रस्टी मुकेश टिल्लू यांना डॉ. गावित यांच्या हस्ते मंदिरावर करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाई संच सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मंदिराचे प्रमुख ट्रस्टी मुंबई येथील मुकेश टिल्लू, हेमलता टिल्लू, शलाखा फडके,तसेच नंदुरबार येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश देसाई, शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सविता जयस्वाल,भाजपाचे माजी नगरसेवक अर्जुन मराठे,आनंद माळी,लक्ष्मण माळी, रमेश चौधरी, निलेश चौधरी, प्रशांत चौधरी आदींसह देसाईपुरा भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








