नंदुरबार l प्रतिनिधी
अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झालेली आहे. उद्या रविवार (दि.२१) रोजी शहरातील सी.बी ग्राउंड पासून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
अयोध्यत प्रभू राम लल्लांचे मंदिर व्हावे यासाठी तब्बल ५ शतकांची वाट पहावी लागली. या सोनेरी क्षणाचे साक्षीदार सर्वच राम भक्त होणार असून, ठीकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू झालेली आहे. नंदुरबार शहरात देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या रविवार (दि.२१) रोजी दुपारी सी.बी ग्राउंड पासून ४ वाजता रॅलीला सुरुवात होईल.
मोटर सायकल रॅली सी.बी ग्राउंड पासून सुरू होऊन गिरीविहार गेट,उड्डाणपूल ,महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट,जळका बाजार,श्री दादा गणपती,मोठा मारुती,अंधारे चौक,आमदार कार्यालय,नगरपालिका मार्गे
राम मंदिर नेहरू पुतळा येथे सायं ७ वा. महाआरतीने सांगता करण्यात येणार आहे.
नियोजनाची बैठक संपन्न
मोटरसायकल रॅलीच्या नियोजनासाठी बैठक लोकनेते स्व.भटेसिंगभैय्या रघुवंशी सभागृहात घेण्यात आली. यावेळी शहरातील असंख्य रामभक्त उपस्थित होते. रॅलीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
महाआरतीच्या मान कारसेवकांना;ॲड. राम रघुवंशी
रॅलीच्या समारोप नेहरू पुतळा परिसरातील राम मंदिरात होणार असून,यावेळी कार सेवकांच्या हस्ते महाआरती करण्यात येईल अशी माहिती ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.रॅलीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे. महिलांनी देखील रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.








