Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलजीवन मिशनच्या कामांना सुरुवात न करणाऱ्या ठेकेदारांना का यादीत टाका : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
January 20, 2024
in राजकीय
0
जलजीवन मिशनच्या कामांना सुरुवात न करणाऱ्या ठेकेदारांना का यादीत टाका : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने गावनिहाय व घरनिहाय योजनांच्या अंमलबजावणीचा डेटा तयार करावा. तसेच येणाऱ्या दोन वर्षात गावातील प्रत्येक घरात शासकीय योजनांची लाभ पोहचवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

 

 

 

ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात ग्रामविकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, कृषि व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, परिविक्षाधिन सनदी अधिकारी तथा नवापूर तहसिलदार अंजली शर्मा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, गट विकास अधिकारी देविदास देवरे (नवापूर) आर.डी. घोरपडे (शहादा) व ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी त्यावर वेळेत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कुठल्याही योजनेचा निधी वेळेत खर्च होण्याबरोबरच तो व्यपगत होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट नसल्याने पात्र असणाऱ्या सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी घ्यावी. सरकारने आखलेल्या सर्व योजना जिल्ह्यातील नागरिकांना 2 वर्षात मिळतील यासाठीचे नियोजन करण्यात यावे.

 

 

 

जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता व कामांचे आदेश त्वरित देण्याची कार्यवाही करावी. कामाचे आदेश वितरीत होवूनही ज्या ठेकेदारांमार्फत काम सुरू झालेले नाही, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकू नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात याव्यात. पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने या कामात कुठलीही दिरंगाई हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जलजीवन मिशनमध्ये ज्या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तेथे तात्काळ नळ कनेक्शन देवून पाणीपुरवठा सुरू करावा. 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून नळ जोडणीसाठी आलेला निधी इतर कामांसाठी खर्च झाला असल्यास तेथे अधिग्राममधून निधी देण्यात येईल.

 

 

 

टंचाईच्या कामांबाबत बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय करुन कामे मार्गी लावावीत. मार्च अखेरपर्यत सर्व कामे होणे अपेक्षित आहे. सर्व गावातील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासोबतच ज्या गांवे-पाडे यांना जोडणारे रस्ते नसतील अशा रस्त्यांची यादी तयार करुन त्वरीत सादर करावी. वर्ष 2024-25 पर्यंत सर्व गांवे-पाडे 100 टक्के रस्त्यांनी जोडली गेली पाहिजेत व ते बारमाही झालेले पाहिजेत. सर्व लोकांपर्यंत त्यांच्या मुलभूत गरजांच्या योजना पोहचल्या पाहिजेत. गावातील स्थलांतर रोखण्यासाठी बचत गट स्थापन करून, उद्योग उभारणीची कामे गावांतच उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.

 

 

 

 

जिल्ह्यातील एकही व्यक्ती स्थलांतरीत होणार नाही याची काळजी सर्व यंत्रणांनी घ्यावी. ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गांवातील अडचणी, त्रुटींबाबातची माहिती सादर करावी. सर्व ग्रामसेवकांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील प्रत्येक घरांची संपर्ण तपशिलवार माहिती संकलीत ठेवावी. जेणे करुन कोणत्या योजना दिल्या कोणत्या बाकी आहेत याची माहिती त्वरीत उपलब्ध होऊ शकेल.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहर व परिसरात दि.२२ जानेवारी रोजी मांस व मद्य विक्री बंद करावी -भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी

Next Post

नंदुरबार येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांची 20 जानेवारी रोजी आरक्षणासाठी मुंबईला पायीदिंडी

Next Post
नंदुरबार येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांची 20 जानेवारी रोजी आरक्षणासाठी मुंबईला पायीदिंडी

नंदुरबार येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांची 20 जानेवारी रोजी आरक्षणासाठी मुंबईला पायीदिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add