शहादा l प्रतिनिधी
श्रीधाम अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना (दि. २२ जानेवारी २०२४) दिवशी शहादा शहर व परिसरातील मांसाहार व मद्यविक्री बंद ठेवण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना लेखी निवेदन दिले आहे.निवेदनाचा आशय असा,श्रीधाम अयोध्या येथे ५०० वर्षानंतर प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे.
प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी शहादा शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचे मांसाहार व मद्यविक्री होवू नये यासाठी संबधित व्यवसायिक, दुकानदार बंधूना नगरपालिका, ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन मार्फत आपली दुकाने बंद ठेवणे बाबत सूचना करावी व हिंदू धर्मीय भाविक तसेच प्रभू श्रीराम भक्तांचा भावनेचा आदर राखावा.तरी या निवेदना द्वारे विनंती करतो की, आपल्या स्तरावरून संबधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन दि. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठाने निमीत्त मांसाहार व मद्यविक्री बंद ठेवण्यात यावी.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद एन. पाटील, तालुकाध्यक्ष शांतीलाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद हुकूमचंद जैन, जिल्हा सचिव कमलेश सावरमल जांगीड , युवा मोर्चाचे रमाशंकर परशराम माळी, तालुका सरचिटणीस विनायक देवीदास सोनार, तालुकाध्यक्ष कृषी आघाडी काशिनाथ आनंदा सोनार,भरत रघू सोनवणे, डॉ.प्रेमसींग आनंदसिंग गिरासे,नंदुराम काशिराम ठाकरे,मयूर अनिल बाविस्कर,संजय सिमाराम पवार,प्रशांत चंद्रशेखर कुलकर्णी, तालुकाध्यक्ष युवा मोर्चा मनेष भगवान पवार, सचिव युवा मोर्चा सोमजी शिवाजी जाधव आदिंची स्वाक्षरी आहे.








