शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील साई संस्थान मंदिराच्या साई भक्तांकडून तोरखेडा ते शिर्डी पालखी पदयात्रा काढण्यात आली.
बुधवार दि.१७ जानेवारी २०२४ रोजी शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांच्या हस्ते साई पालखीचे पूजन करून प्रस्थान करण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रियदर्शन कदमबांडे (बनीबाबा), माजी सरपंच इस्माईल लोहिया, सरपंच मनिषभाऊ गरूड,साई संस्थान तोरखेडाचे दिनेश मोरे,दिनेश वाडिले, आकाश मोरे यांच्यासह साईभक्त ग्रामस्थ उपस्थित होते.पदयात्रेचे १६ वे वर्ष असून युवा नेते मयूरभाई पाटील यांच्या सौजन्याने पालखी पदयात्रा काढण्यात आली आहे.