नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदू धर्माची अस्मिता जोपासणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ आहे. हे औचित्य साधून श्रीराम लल्ला सोहळ्यानिमित्त नंदनगरीत सर्वसमावेशक शोभायात्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आज मंगळवार दि.16 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेला मोठा मारुती मंदिर श्रॉफ हायस्कूलजवळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाज सेवा आणि प्रभू रामचंद्र प्रेमींच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस शहरातील विविध समाज अध्यक्ष, व्यायाम शाळा पदाधिकारी, गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष तसेच विविध सेवाभावी संस्था, संघटना, मंडळ, ग्रुप आदींनी आज होणाऱ्या नियोजन बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नंदुरबार मोठा मारुती श्रीराम मंदिर सकल हिंदू समाज अयोध्या उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
कुणालाही वैयक्तिक आमंत्रण पाठवण्यात आलेले नसून हिंदू धर्माची अस्मिता जपणाऱ्या या अभूतपूर्व महोत्सवाच्या नियोजनासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत संयोजकांनी कळविले आहे.








