नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तर्फे मकर संक्रांती निमित्त सालाबादा प्रमाणे लहान बालगोपाळांना आणि युवकांना त्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी शहरातील प्रभागात व जनसंपर्क कार्यालय येथे 5000 पतंगाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तळोदा शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मा.आमदार तथा जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी नायलोने मांजा न वापरण्याचे आवाहन केले जेणेकरून पशुपक्षी आणि मनुष्य यांची जीवित हानी टाळता येईल तसेच उदेसिंग पाडवी यांनी जिल्हा वासियांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते पतंगाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामराव आगाडे, बूथ प्रमुख जिल्हाध्यक्ष केसगसिंग क्षत्रिय, तालुकाध्यक्ष संदीप परदेशी,शहर अध्यक्ष योगेश मराठे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आदिल शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष आरिफ शेख नुरा,याकूब पिंजारी,
विकासगीर गोसावी, राहुल पाडवी,गणेश पाडवी,रवि पाडवी,गणेश राणे, मुकेश पाडवी,संदीप वळवी, देवेश मगरे,युवराज चव्हाण,शोएब पठाण,नितीन वाघ,हितेश राणे,शेख रफिक,रितेश साळी,इमरान शिकलिकर,आसिफ शेख,प्रकाश पाडवी आदि उपस्थित होते.








