नंदुरबार l प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक कार्यकर्त्यांना पदांचे वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्यात पक्ष मजबूत व्हावा आणि पक्ष वाढवा यासाठी पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यात येत असून जे चांगले आणि मेहनतीने काम करत आहे. अशा कार्यकर्त्यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी नंदुरबार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विविध पदावर नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राऊ दिलीपराव मोरे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी देवेंद्रसिंग राजपूत, जिल्हा सचिवपदी अमित शेवाळे, नंदुरबार शहराध्यक्षपदी विजय (लल्ला पहेलवान) भिका मराठे, नंदुरबार तालुकाध्यक्षपदी गौरव सुरेश महिरे यांची पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांनी कौतुक केले आहे.
पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण अजित पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्ष संघटना उभी कराल व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस प्रदेश संघटक बबलू कदमबाडे, जितेंद्र ठाकरे, लाला बागवान, कालू पहेलवान, अदनान मेमन, योगेश कोळी, प्रसाद पाटील, नागेश पवार, कमलेश खैरनार, रामचंद्र निकुंभे आदी उपस्थित होते.








