नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात वरचढ ठरत असून, मागासलेपणाच्या ठसा पुसून जाऊन समाजात चांगले कार्य होत आहे. विधायक समितीच्या माध्यमातून माजी आ. स्व.बटेसिंग भैय्या रघुवंशी यांनी शिक्षणाची गंगा तापी आणि नर्मदेच्या मधल्या खोऱ्यात आणून हजारो युवक डॉक्टर, वकील आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांनी केले.
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हस्ते पार पडला.उद्घाटन न्या.भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. विधी महाविद्यालयाला स्व.बटेसिंग रघुवंशी तर औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाला श्रीमती विमलताई बटेसिंग रघुवंशी यांचे नाव देण्यात आले आहे. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
यावेळी न्या.गवई म्हणाले, विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी अंगीकारले पाहिजे. मेहनतीच्या जोरावर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी वकील ते न्यायाधीशापर्यंत मजल मारू शकतात. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल,महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.परिजात पांडे, नवीदिल्लीचे बार कौन्सिलचे सदस्यॲड.जयंत जयभावे,महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. राजीव पाटील,उच्च न्यायालयाचे मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड.अमरजितसिंह गिरासे,महाराष्ट्र व गोव्याचे बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप,सदस्य ॲड.उदय वारुंजीकर,ॲड.संग्राम देसाई, ॲड.आशिष देशमुख, विधायक समितीचे संचालक मनोज रघुवंशी,
संचालक तथा जि.प सदस्य राम रघुवंशी,सचिव यशवंत पाटील, अनिल गोवरदिपे,ॲड.हर्षद निंबाळकर, ॲड.
सतीश देशमुख, ॲड.अमोल सावंत, ॲड. उच्च न्यायालय बार कौन्सिल औरंगाबाद येथील उच्च न्यायालय बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. एन.एल जाधव उपस्थित होते.








