नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे पवित्र कुरान पठण करणाऱ्या दोन्ही युवकांचा सत्कार करण्यात आला.
नंदुरबार शहरातील दारुल उलूम रियाजुलजन्नह या मदरसातील हाफिज तन्वीर अब्दुल कदीर सय्यद
(वय 16 वर्ष), हाफिज सिद्दीक शबकदर पिंजारी
(वय 17 वर्ष ) या दोन युवकांनी पवित्र कुरान पूर्ण पठण केले असून त्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. अक्कलकुवा येथील मौलाना अब्दुल रहेमान मिल्ली यांच्यातर्फे दोघी युवकांना सनद देऊन सन्मानित करण्यात आले. पवित्र कुराण पठाण केले असल्यामुळे दोन्ही युवकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.








