Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध धंद्यांवर संक्रांत : पोलीस दलातर्फे विशेष मोहीम, 8 दिवसात 350 कारवाया

team by team
January 13, 2024
in क्राईम
0
धडाकेबाज कारवाई: अवैध धंदयांविषयी माहिती मोबाईलवर कळवा : पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे जिल्हा वासियांना आवाहन

नंदूरबारl प्रतिनिधी

 

नंदुरबार पोलीस दलातर्फे 3 ते 11 जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.यात अवैध जुगाराचे विरुद्ध 104, अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक करणा-यांविरुद्ध एकूण 231, अवैध गुटखा, 6 कारवाया,गांजाची 1 कारवाई करण्यात आली.

 

 

 

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 3 जानेवारी सायंकाळी 8 ते 11 जानेवारी 2024 च्या सकाळी 6 वा. दरम्यान जिल्ह्यात एक आठवडा विशेष मोहिम राबविण्यात आली होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्‌ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिम राबविणेबाबत नियोजन केले. सदर विशेष मोहिमे दरम्यान अवैध / बेकायदेशीर बाबींवर कडक कायदेशीर कारवाई करणे बाबतच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सर्व उप-विभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

 

 

 

त्यानुसार एक आठवडयाचे विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्हयात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाणे यांच्या मार्फतीने करण्यात आलेली कारवाई, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत अवैध जुगाराचे विरुद्ध एकूण 104 कारवाया करण्यात आल्या असुन त्यामध्ये एकूण 3 लक्ष 4 हजार 400 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक करणा-यांविरुद्ध एकूण 231 कारवाया करण्यात आले असुन त्यामध्ये एकूण 64 लक्ष 20 हजार 708 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

प्रतिबंधित पानमसाला सुगंधित तंबाखू, गुटख्याचे बेकायदेशीर विक्री व साठा करणाऱ्यांविरुद्ध एकूण 6 कारवाया करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 3 लक्ष 89 हजार 950 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत एकूण 2 कारवाई करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 17 गोवंश हे गोशाळेचे ताब्यात देण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरुध्द NDPS कायदयांतर्गत गांजाची 1 केस करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 3 लक्ष 52 हजार 380 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

तसेच यापुढे देखील अवैध धंदयांवर जिल्हयात वेळोवेळी कडक कारवाई करण्याचे संपुर्ण जिल्हा पोलीस दलास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सक्त सुचना दिल्या आहेत. अवैध/बेकायदेशीर बाबींविषयी कुठल्याही प्रकारची माहीती सामान्य नागरिकांना अवगत असल्यास ते कळविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नंदुरबार जिल्हावासियांना केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आमदार कार्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांना अभिवादन

Next Post

पवित्र कुरान पठण करणाऱ्या दोघा युवकांच्या सत्कार

Next Post
पवित्र कुरान पठण करणाऱ्या दोघा युवकांच्या सत्कार

पवित्र कुरान पठण करणाऱ्या दोघा युवकांच्या सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add