नंदुरबार l प्रतिनिधी
मोड, ता.तळोदा येथील माधव मोतिराम नवले यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक पोल वरून १० हजार ४०० रुपयांची ॲल्युमिनियमची तार लंपास केल्याची घटना घडली.आहे.याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
तळोदा तालुक्यात मोड येथील माधव मोतिराम नवले यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक पोल वरून १० हजार ४०० रुपयांची ॲल्युमिनियमची तार लंपास केल्याची घटना 8 जानेवारी सायंकाळी 7 ते 9 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान घडली.आहे.
याबाबत वीज कर्मचारी भाईदास कोचरू पाडवी यांच्या फिर्यादिवरून दिल्याने तळोदा पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोह वनसिंग पाडवी करीत आहेत








