तळोदा l प्रतिनिधी
तलाठी परीक्षाची चौकशी करून पुन्हा निकाल जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री विखे पाटील यांना तहसीलदार तळोदा यांच्यामार्फत एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आज निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, तलाठी परीक्षाची चौकशी करून पुन्हा निकाल जाहीर करण्यात यावे त्याबाबत की, महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग मार्फत तलाठी भरती संदर्भात जाहिरात जून महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती, सदर जाहिरातीच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एकूण 57 संत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली, सदर परीक्षा टी:सी.एस कंपनीमार्फत घेण्यात आली होती तलाठी परीक्षेच्या निकाल 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला,
सदर निकालाबाबत परीक्षार्थी मध्ये संभ्रम अवस्था आहे, सदर परीक्षा 200 मार्कांकरिता आयोजित केली होती, परंतु सदर परीक्षेत निकालांती एकूण 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क आहेत, यावरून परीक्षा हे पारदर्शकपणे घेतली गेली नाही व निकाल हे पारदर्शकपणे जाहीर केलेला नाही, व पुन्हा पारदर्शकपणे निकाल जाहीर करण्यात यावा, सदर निकालात विद्यार्थ्यांचे समानीकरण अगोदरचे मार्क देखील जाहीर करावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही संभ्रमावस्था असणार नाही,
निवेदनाची दखल घेऊन तलाठी भरतीची आर्थिक व्यवहार झाल्याची संशय असल्यामुळे, E.D मार्फत चौकशी करून टी.सी.एस कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, तलाठीसह सर्व सरळ भरती व सरकारी पदभरती परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवक आयोगाकडे देण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता अँड गणपत पाडवी, अंबालाल पाडवी, सुनील पाडवी, मुकेश पाडवी आदी उपस्थित होते.








