नंदुरबार l प्रतिनिधी-
खापर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील भोई, शिंपी, न्हावी, तडवी अशा प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र समाज सभा मंडप उभारण्याला खा. डॉ. हिना गावित यांनी मान्यता मिळवून देत विकास निधीतून 60 लाख रुपये या कामासाठी मंजूर करून दिले आहेत.
खा. डॉ.हिना गावित यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटलेले आहे की, प्रत्येक गावातील प्रत्येक जातीच्या प्रत्येक जमातीच्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असून विकास निधीचा योग्य लाभ मिळवून देत असतो. खापर तालुका अक्कलकुवा येथील चार सभा मंडपांना या अंतर्गतच निधी मंजूर करण्यात आला आहे.
खापर तालुका अक्कलकुवा येथील सरपंच किरण पाडवी, पॅनल प्रमुख तथा उपसरपंच विनोद यशवंतराव कामे यांनी सातत्याने या कामांचा पाठपुरावा चालवला होता. भोई समाज, शिंपी समाज, न्हावी समाज आणि तडवी समाज अशा चार सभामंडपांचा यात समावेश असून या कामांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे खापर येथील सर्व समाज घटकातून आनंद व्यक्त केला जात आहे.








